प्रियकराने फोन न उचलल्याने प्रेयसीची गळफास घेऊन आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

उत्तर प्रदेशच्या नोएडा भागात एका तरुणीने आपल्या प्रियकराशी झालेल्या वादामुळे गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सदर तरुणीचे वय 22 असून ती दिल्ली विद्यापीठात शिकत होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्वाती सैनी ही नोएडामध्ये रहत होती. स्वाती दिल्लीच्या विद्यापीठात कायद्याचे शिक्षण घेत होती. रविवारी रात्री तिने आपल्या राहत्या घरी पंख्याला लटकून आत्महत्या केली.

स्वातीचे स्वप्नील कुमार गुप्ता या तरुणाशी प्रेमसंबंध होते. दोघांची फेसबुकवर मैत्री झाली. स्वप्नील गलगोटिया विद्यापीठात बी.टेकच्या तिसर्‍या वर्षात शिकत आहे.  स्वाती रात्रभर स्वप्नीलला फोन करत होती. परंतु त्याने फोन उचलला नाही. शेवटी स्वातीने चिडून स्वप्नीलला व्हॉट्सऍपवर आत्महत्या करत असल्याचा संदेश पाठवला आणि गळफास घेतला.

पोलिसांना सदर घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्वातीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून स्वप्नीलला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.