गर्लफ्रेंडचे होते दुसऱ्या पुरुषाशी संबंध, बॉयफ्रेंडने काढला काटा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशामध्ये एका दुहेरी हत्याकांडाची घटना उघड झाली आहे. यात दोन अल्पवयीन मुलांची अत्यंत निर्दयीपणे हत्या करण्यात आली आहे. हत्येनंतर आरोपींनी त्या मुलांचे मृतदेह एका खड्ड्यात पूरून टाकले होते. ही घटना गोरखपूर जिल्ह्यातील झगहां या निमशहरी भागाजवळील पलिपा या गावात घडली आहे. या दुहेरी हत्याकांडाने परिसरात खळबळ उडाली होती.

मिथुन कुमार उर्फ शिवम प्रताप याला एका मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक झाली होती. यावेळी तुरुंगात कैद असताना त्याची एका शिक्षा भोगत असलेल्या जोडप्याशी ओळख झाली. मिथुनची त्यांच्यासोबत चांगली ओळख झाली होती. त्यामुळे त्या जोडप्याने त्यांच्या मुलीची काळजी घेण्याची जबाबदारी त्याला दिलेली. मिथुन तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्या मुलीसोबत राहू लागला. ते दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असल्यासारखे राहत होते. मिथुन त्या मुलीवर प्रेम करू लागला होता. मात्र आठ महिने एकत्र राहिल्यानंतर त्या मुलीला मिथुनसोबत राहण्याचा कंटाळा आला व तिचे सूत आकाश नावाच्या मुलासोबत जुळले. मिथूनला ते समजताच तो संतापला. त्याने आकाशला ठार मारण्याचा कट रचला. मिथून व त्याचा मित्र सत्यम या दोघांनी मिळून 10 जानेवरी रोजी त्याची हत्या केली. आकाशची हत्या केल्यानंतर तिथे अचानक गणेश पोहोचला आणि त्याने हा सर्व प्रकार पाहिला. त्यामुळे हत्येची कुणाला मााहिती कळू नये म्हणून मिथुनने गणेशच्या डोक्यात जोराने वार करत त्याची हत्या केली.

पलिपा गावातील दोन बेपत्ता अल्पवयीन मुले आकाश आणि गणेश यांच्यासाठी पोलिसांनी शोध मोहिम हाती घेतली होती. यानंतर 25 जाने रोजी गावाच्या जवळच एका शेतात दोघांचे मृतदेह आढळून आले. या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांना मिथून आणि सत्यम विषयी समजले व त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.