सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेच्या फेडरल बँकेने व्याजदरात 0.25 बेसिक पॉइंटची वाढ केली आहे. या निर्णयाचा परिणाम वायदे बाजारात सोनेचांदीच्या किमतीवर झाला आहे. या निर्णयामुळे सोने आणि चांदीच्या दरात गुरुवारी अचानक मोठी घसरण झाली. चांदीच्या दरात 4500पेक्षा जास्त घसरण झाली, तर सोने दोन हजार रुपयांनी स्वस्त झाले आहे. गुरुवारी वायदे बाजार उघडताच सोने आणि चांदीच्या दरात अचानक मोठी घसरण झाली. वायदे व्यवहार सुरू होताच, दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमती कोसळल्या. बुधवारच्या बंद भावाच्या तुलनेत 1 किलो चांदीचा भाव  2.32 लाखांपर्यंत घसरला. या घसरणीमुळे चांदीचा भाव आता त्याच्या आतापर्यंतच्या उच्चांकी भावापेक्षा प्रतिकिलो अंदाजे  1.90 लाखांनी कमी झाला आहे.