Google ने मे महिन्यात होणाऱ्या वार्षिक डेव्हलपर कॉन्फरन्सच्या आधी नोकऱ्यांमध्ये कपात करून, संपूर्ण पायथन टीमला काढून टाकले आहे.
Google ने Flutter, Dart, Python सारख्या प्रमुख विभागातील कर्मचारी काढून टाकले आहेत आणि प्रभावित कर्मचाऱ्यांनी त्यांची माहिती सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. हॅकर न्यूज आणि रेडिटवरील काही कर्मचाऱ्यांनी दावा केला आहे की संपूर्ण पायथन टीमला Google ने काढून टाकले आहे. पायथन हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगमध्ये वापरला जाणारा एक प्रमुख कोड आहे. गुगलने आपल्या पायथन टीमला काढून टाकले नाही परंतु विद्यमान टीमची जागा म्युनिकमधील दुसऱ्या गटाला देण्यात आली आहे.
काही युझर्सचं म्हणणं आहे की Google अमेरिकेबाहेर इतरत्र स्वस्त पर्याय शोधत आहे.
Google ने सांगितलं की ते सर्व प्रभावित कर्मचाऱ्यांना स्थानिक आवश्यकतांनुसार संरक्षण देईल.
Google चे प्रवक्ते ॲलेक्स गार्सिया-कुमर्ट यांनी टेकक्रंचला सांगितलं की, ‘आम्ही म्हटल्याप्रमाणे, आम्ही आमच्या कंपनीच्या सर्वात मोठ्या प्राधान्यक्रमांमध्ये आणि महत्त्वाच्या संधींमध्ये जबाबदारीने गुंतवणूक करत आहोत’.
गुगलच्या डार्ट अँड फ्लटर भाषेतील उत्पादन व्यवस्थापकाने X वर सांगितलं, ‘आमच्या टीमच्या वरच्या किमान दोन स्तरांवरील कर्मचाऱ्यांना काढण्याचा निर्णय घेण्यात आला आणि बऱ्याच टीमवर त्याचा परिणाम झाला. बऱ्याच लोकांना त्यांनी नोकऱ्या गमावल्याची माहिती मिळाली आहे’.
एका कर्मचाऱ्याने LinkedIn वर जाऊन त्याच्या व्यवस्थापकासह आणि टीमच्या काही सदस्यांसह त्याच्या कामावरून काढल्याबद्दल ज्या रात्री त्याला समजले त्याची माहिती दिली आहे. मॅट हू गेल्या दोन वर्षांपासून गुगलमध्ये सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून काम करत आहेत. तो अमेरिकेत H-1B व्हिसावर राहत असून मूळचा चीनचा आहे.
Google ने सांगितलं की ते सर्व प्रभावित कर्मचाऱ्यांना, स्थानिक गरजांच्या अनुषंगाने, त्यांना Google किंवा इतरत्र विविध नोकऱ्या शोधण्यासाठी, आउटप्लेसमेंट सेवांमध्ये प्रवेश आणि बाहेर पडण्यासाठी वेळ देऊन समर्थन करेल, TechCrunch ने रिपोर्टमध्ये म्हटले आहे.