रात्रीच्या अंधारात प्रेयसीला भेटायला गेला, तिच्या घरच्यांनी अवयवच कापला

murder-knife

गुजरातच्या अमरेली जिल्ह्यात एक अनोखे प्रकरण समोर आले आहे. रात्री प्रेयसीला भेटायला गेलेल्या तरुणाला प्रेयसीच्या घरच्यांनी एकत्र पाहिले आणि पुढे असे काही झाले की तरुणाला रुग्णालयात भरती करण्यात आले. याप्रकरणी पाचजणांना पोलिसांनी अटक केले आहे.

गुजरातच्या अमरेली जिल्ह्यातील जीवापूर गावातील घटना आहे. प्रकाश कोली असे पीडित तरुणाचे नाव आहे. तेवीस वर्षांचा प्रियकर रात्रीच्या अंधारात आपल्या प्रेयसीला भेटायला तिच्या घरी गेला होता. मात्र प्रेयसीच्या घरच्यांनी त्या दोघांना एकत्र पाहिले आणि एकच गोंधळ उडाला. त्यांनी त्या तरुणाला पकडून मारहाण केली आणि प्रेयसीच्या काकाने त्याचे नाकच कापून टाकले.

प्रकाशला जवळच्या रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या गावात या तरुणाचे नाक कापण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. पोलिसांनी सोमवारी या घटनेची माहिती दिली. याप्रकरणी पाच लोकांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या व्यक्तींमध्ये जगदिश पिपलिया, सारदाबेन पिपलिया, सुरेश पिपलिया, अतुल पिपलिया आणि कालू पिपलिया अशी त्यांची नावे आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या