सेल्फी घेताना ट्रेनखाली सापडले; गुरुग्राममध्ये चार तरुणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
railway-zero-accident

राजधानी दिल्लीजवळील ग्रुरुग्राममध्ये मंगळवारी धक्कादायक घटना घडली आहे. मंगळवारी संध्याकाळी सेल्फी घेण्याच्या नादात ट्रेनखाली आल्याने चार तरुणांचा मृत्यू झाला आहे. बसई धनकोट रेल्वे स्थानकाजवळ ही दुर्घटना घडली आहे. घटनास्थळी जीआरपी पोलीस दाखल झाले असून मृतांची ओळख पटवण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत.

गुरुग्राम रेल्वे स्थानकातून जनशताब्दी एक्सप्रेस संध्याकाळी 4 वाजून 48 मिनिटांनी सुटली होती. ही रेल्वे बसई धनकोट स्थानकाजवळ पोहचत असतानाच रेल्वे रुळांवर सेल्फी घेणारे चार चरुण ट्रेनखाली सापडले. या दुर्घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच जीआरपी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून मृतांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या दुर्घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.