
अपर्णा गोविल भास्कर
डी मास इंडेक्स (बीएमआय वजन (किलो) भागिले उंची (मीटर स्क्वेअरमध्ये)) हे समीकरण लठ्ठपणाची व्याप्ती मोजण्यासाठी वापरले जाते. जास्त वजन आणि लठ्ठपणा यांच्यात फरक ओळखण्याचा हा एक उपयुक्त मार्ग आहे. हिंदुस्थानी/आशियाई लोकांसाठी बीएमआयची सामान्य श्रेणी 18.5 ते 22.9 Kg/m2 इतकी आहे. बीएमआय नेहमीच अचूक नसतो. विशेषतः ज्या क्रीडापटूंच्या शरीरातील चरबीच्या तुलनेत जास्त स्नायू असतात. त्यांच्या बाबतीत बीएमआय अधिक असू शकतो, पण ते लठ्ठपणास संबोधित करता येत नाही. बीएमआय हा जगभरातील सर्वात जास्त वापरला जाणारा पॅरामीटर आहे.
वजन वाढण्याची कारणे अनेक आहेत. 70 टक्के लठ्ठपणा हा आनुवंशिकतेमुळे येऊ शकतो. वजन वाढण्यास कारणीभूत असलेल्या इतर घटकांमध्ये पॅलरीजचा अतिवापर, खाण्यापिण्याची अनियमित पद्धत, बैठी जीवनशैली, चयापचय रोग, काही औषधे, थायरॉईड समस्यांसह वैद्यकीय आजार किंवा इतर हार्मोनल असंतुलन यांचा समावेश होतो. अन्नसंवेदनशीलता आणि शारीरिक मर्यादा ज्यामुळे हालचाल कमी होते तेदेखील वजन वाढण्यास कारणीभूत ठरू शकतात.
जादा वजन म्हणजे काय?
जास्त वजन ही पूर्व लठ्ठपणाची प्राथमिक अवस्था म्हणूनही ओळखली जाते. पाश्चिमात्य लोकसंख्येसाठी 25.0 आणि 29.9 kg/m2 दरम्यान बीएमआय असणे म्हणजे जास्त वजन असणे. तथापि, 23 ते 25 kg/m2 मधील बीएमआय असलेले आशियाई लोक जादा वजन म्हणून वर्गीकृत आहेत. 2000 मध्ये डब्ल्यूएचओने अभ्यासाचे पुनरावलोकन केल्यानंतर हे सुधारित केले होते ज्यामध्ये असे दिसून आले होते की, शरीरातील चरबीच्या उच्च टक्केवारीमुळे आशियाई लोकांना 22-23 kg/m2 च्या कमी बीएमआयवरदेखील लठ्ठपणा संबंधित रोग होण्याचा धोका जास्त असतो. लठ्ठपणाशी संबंधित रोग आणि मृत्यू होण्याचा धोका जास्त वजन असलेल्या लोकांमध्ये लठ्ठपणा असलेल्या लोकांच्या तुलनेत कमी असतो.
लठ्ठपणा म्हणजे काय?
आशियाई/हिंदुस्थानींसाठी, 27.5 kg/m2 चा बीएमआय हा लठ्ठपणा मानला जातो. बीएमआय अनुक्रमे 27.5 ते 32.4 Kg/m2, 32.5 ते 37.4 Kg/m2 आणि 37.5 Kg/m2 असताना लठ्ठपणाचे पुढे ग्रेड I, ग्रेड II आणि ग्रेड III लठ्ठपणा असे वर्गीकृत केले जाते. ग्रेड III लठ्ठपणाला लठ्ठपणाचा आजार किंवा वैद्यकीयदृष्टय़ा गंभीर लठ्ठपणा असे संबोधले जाते. अभ्यासांनी हे दाखवून दिले आहे की, जेव्हा बीएमआय वाढतो, तेव्हा अनेक आरोग्य समस्या विकसित होण्याचा धोका वाढतो.
कसा वाढतो धोका?
पुरेसा व्यायाम न करणे, खाण्यापिण्याची अनियमित पद्धत, पॅलरीयुक्त आहार, कार्बोनेड पेय आणि शर्करायुक्त पेयाचे सेवन, अपुरी झोप आणि ताणतणाव यामुळे जास्त वजन आणि लठ्ठपणाचा धोका वाढतो.
- आहाराच्या प्रमाणासह गुणवत्तेवर लक्ष पेंद्रित करून मनापासून अन्नाचे सेवन करा. तंतुमय आणि प्रथिनयुक्त पदार्थांचे सेवन करा. प्रक्रिया केलेले पदार्थ जसे की बेकरीचे पदार्थ, तळलेले पदार्थ, केक आणि मिठाई यांचे सेवन टाळा.
- दररोज किमान 40-45 मिनिटे व्यायाम करा किंवा मध्यम शारीरिक हालचाली करा. याशिवाय पायऱया चढ-उतार करणे, लिफ्टऐवजी जिने वापरणे, जवळच्या अंतरावर जाण्याकरिता वाहनाचा वापर न करता चालत जाणे.
- पुरेशी झोप घ्या. झोपेचे वेळापत्रक पाळा.
- तणावापासून स्वतःला दूर ठेवा. तणाव कमी करण्यासाठी आवडते छंद जोपासा, मेडिटेशन करा.
(लेखिका बॅरिएट्रिक आणि लॅपरोस्कोपिक सर्जन आहेत तसेच सैफी, नमाहा, अपोलो स्पेक्ट्रा आणि क्युरे स्पेशालिटी हॉस्पिटल्समध्ये सल्लागार आहेत)





























































