
‘हेरा फेरी 3’ ची प्रतीक्षा करणार्या चाहत्यांसाठी मोठी बातमी आहे. राजू, श्याम आणि बाबूराव पुन्हा एकदा धमाल करायला येत आहेत. ‘हेरा फेरी’ चे 21 वर्षे पूर्ण झाल्यावर निर्माता फिरोज नाडियाडवाला यांनी ‘हेरा फेरी 3’ बद्दल एक मोठी अपडेट दिली आहे.
‘पिंकविला’शी बोलताना फिरोज नाडियाडवाला यांनी सांगितलं की, ते लवकरच अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि पारशा रावल याच्या सोबत ‘हेरा फेरी 3’ सिनेमावर काम सुरू करणार आहेत. तसेच त्यांनी सांगितलं की, फक्त ‘हेरा फेरी-3’ नाही तर या मालिकेत ते इतर सिनेमांचादेखील समावेश करणार आहेत. ज्याचे नाव ‘हेरा-फेरी’ या चित्रपटावर आधारित असेल.
फिरोज नाडियाडवाला यांनी या चित्रपटाबाबत अधिक माहिती देताना सांगितलं, या चित्रपटात ‘हेरा फेरी 2’ च्या समाप्तीच्या सिनचेही उत्तर मिळणार आहे. म्हणजेच या चित्रपटाच्या तिसऱ्या भागात दुसऱ्या भागातील स्टोरी पुढे सरकताना दिसणार आहे. ‘हेरा फेरी’ मध्ये अक्षय, सुनील आणि परेश याच्या व्यतिरिक्त तब्बू आणि ओम पुरी यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारली होती.




























































