
कॉफी… तीही बटर घालून… कॉम्बिनेशन ऐकून हैराण झालात ना… जुन्या दिल्लीतील रस्त्यावर एक इसम अशी बटर कॉफी विकतो. या कॉफीचा आस्वाद फूड ब्लॉगर अमर सिरोही यांनी नुकताच घेतला. त्यांनी इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करून बटर कॉफीची माहितीही दिली. ग्लासात दूध आणि कॉफी पावडर टाकायची. नंतर त्यात लोणी मिसळायचे. वरून कोको पावडर शिंपडायची की झाली बटर कॉफी. रेसिपीचा हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. नेटिजन्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. ‘असं याआधी कधी बघितलं नाही’, असं काहींनी म्हटलंय, तर काहींनी ‘बस्स, हेच बघणं बाकी होतं’, अशी नाराजीची प्रतिक्रिया दिली.




























































