परत आलीस तर चामडी सोलून काढेन! अंजूच्या पतीने दिला इशारा

गेल्या महिन्यात गुपचूप पाकिस्तानात पळून गेलेल्या अंजूला तिचा भारतीय पती अरविंद याने गर्भित इशारा दिला आहे. जर हिंदुस्थानात परत आली तर चामडी सोलून काढेन अशी धमकीच अंजूचा नवरा अरविंद याने दिली आहे. अरविंदने दिलेली ही धमकी छुप्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे. अरविंदने म्हटलंय की त्यांच्या मुलांनाही अंजूसोबत राहायचे नाहीये. अंजूला आपल्या मुलांना काय त्रास होत असेल याची पर्वा नसून तिला जर पर्वा असती तर ती तत्काळ हिंदुस्थानात आली असती असं अरविंदने म्हटलंय. ” मुलांना आपल्यासोबत घेऊन जाण्याची हिंमत अंजूमध्ये असेल, तर तिने हिंदुस्थानात येण्याची हिम्मत करून दाखवावी. ” अरविंद यांनी म्हटलंय की जेव्हा केव्हा अंजूची बातमी टीव्हीवर दिसते तेव्हा आमची अवस्था फार वाईट होते.

अरविंदने अंजूने उल्लेख केलेल्या च्या गुप्त कपाटाबद्दलही सांगितले आहे. अंजूने हे कपाट पाकिस्तानात गेल्यानंतर उघडू नका असे सांगितले होते. या कपाटात अंजूची पाकिस्तानशी निगडीत कागदपत्रे असण्याची सक्यता आहे. अरविंद यांनी म्हटलंय की पाकिस्तानी सरकार व्हिसाला किती दिवस मुदतवाढ देईल. 2-3 महिन्यांनी अंजूला हिंदुस्थानात परतावंच लागेल. अंजू ही आपल्यात जाळ्यात गुरफटत चालली असून तिला नेपाळमार्गे हिंदुस्थानात यावंच लागेल असं अरविंद यांनी म्हटलंय. अरविंद यांना अंजूची इन्स्टाग्रामवर सात ते आठ प्रोफाईल सापडली असून त्यांनी त्यातून आवश्यक ती माहिती गोळा करून ठेवली आहे.

अंजू हिने अरविंद हे आपल्याला मारहाण करत असल्याचा आरोप केला होता. हा आरोप सपशेल खोटा असल्याचे अरविंद यांनी म्हटले आहे. “ अंजूच्या थोबाडाकडे बघून वाटतं का, की ती कुणाला मारायला देईल? अंजू आणि नसरुल्लाह यांनी कधीच विचार केला नसेल की त्यांच्याविरोधात मी पोलिसांत तक्रार दाखल करेन म्हणून, मात्र अंजू पळाल्यानंतर मी या दोघांविरोधात तक्रार दाखल केली. यामुळे अंजू हिंदुस्थानात आल्यानंतर तिच्या अडचणी वाढणार आहेत.

अंजू गेल्या महिन्यात पाकिस्तानला गेली होती. तिथून तिने पती अरविंद आणि मुलांना आपण पाकिस्तानला आलो असल्याचे सांगितले होते. हे ऐकल्यानंतर त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला होता. यानंतर अंजूने नसरुल्लाशी लग्न केल्याचं कळालं तेव्हा त्यांना आणखी एक धक्का बसला. लग्नासाठी अंजूने धर्म बदलल्याचं अरविंद यांना कळालं होतं. सुरुवातीला अंजू आणि नसरुल्लाने आपले लग्न झाल्याची अफवा असल्याचे म्हटले होते. या दोघांचे लग्न झाल्याचे जाहीर केल्यानंतर पाकिस्तानी आनंदाने नाचू लागले आहेत. यातल्या एका पाकिस्तानी व्यावसायिकाने अंजू आणि नसरुल्लाला भूखंड देण्याची घोषणा केली होती. यासोबतच अंजूला पाकिस्तानी नागरिकत्व मिळाल्यास तिला आपल्या कंपनीचे ब्रँड अॅम्बेसेडर बनवू आणि घर बसल्या पगार देऊ अशी घोषणाही केली होती.