T20 Word Cup टीम इंडियाच्या पराभवानंतर आयीसीसीला जाग आली, मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयसीसी टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना रविवारी सायंकाळी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड संघात रंगणार आहे. प्रबळ दावेदार असलेल्या हिंदुस्थानच्या संघाने सेमीफायनलपूर्वीच गाशा गुंडाळला. यानंतर टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहसह (Jasprit Bumrah) मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी बायो बबलचा मुद्दा उपस्थित केला होता. आता यावर आयसीसी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

विश्वचषकामध्ये टीम इंडियाची कामगिरी सुमार झाली. ग्रुप-2 मध्ये असलेल्या हिंदुस्थानच्या संघाला पहिल्या दोन लढतीत पाकिस्तान आणि न्यूझीलंडने मोठ्या फरकाने पराभूत केले. यानंतर विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानच्या संघाने सलग तीन सामने जिंकले, मात्र सेमीफायनल गाठण्यात अपयश आले. यानंतर बुमराह आणि रवी शास्त्री यांनी बायो बबलवर सलाव उपस्थित केले होते. टीम इंडियाचा संघ गेल्या 6 महिन्यांपासून (इंग्लंड दौरा, आयपीएल आणि विश्वचषक) बायो बबलमध्ये होता आणि याचा परिणाम त्यांच्या कामगिरीवर झाला.

आता आयसीसी इंग्लिश प्रीमिअर लीगचा फॉर्म्यूला (ईपीएल) अवलंबवण्याच्या तयारीत आहे. खेळाडूंची सातत्याने कोरोना चाचणी करण्यात येईल आणि त्यामुळे त्यांना बायो बबलमध्ये राहण्याची आवश्यकता भासणार नाही. ईपीएलमध्ये संपर्कात आलेल्या लोकांना देखील आयसोलेशनमध्ये पाठवण्यात येत नाही. फक्त कोरोना पॉझिटिव्ह आलेल्यांना क्वारंटाईन करण्यात येते.

टीम इंडियाच्या खेळाडूच्या ‘त्या’ पोस्टमुळे वाद; स्पष्टीकरण देत म्हणाला, मी तर फक्त…

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, आयसीसीच्या चीफ एक्झिक्यूटिव्ह समितीची शुक्रवारी बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये या मुद्द्यावरही चर्चा झाली. बायो बबलमुळे यामुळे खेळाडूंच्या मानसिक आरोग्यावर परिमाण होत आहे. त्यामुळे बायो बबल सिस्टीम अधिक काळासाठी चालू राहू शकत नाही, असे मत अनेक सदस्यांनी व्यक्त केले.

दरम्यान, बायो बबलबाबत कधी निर्णय घेण्यात येईल हे स्पष्ट झालेले नाही. पुढील वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये टी-20 विश्वचषक होणार आहे. या विश्वचषकापूर्वी खेळाडूंची बायो बबलमधून सुटका होण्याची शक्यता आहे.