
बॉलिवूड आणि एकूणच माध्यमाशी संबंधित उद्योगांमध्ये बाह्य रुपाला खूपच महत्त्व असतं. त्याचे काही अलिखित मापदंड असतात. त्या मापदंडांमध्ये बसण्यासाठी अनेक कलाकार व्यायाम, डाएट, सर्जरी यांचा आधार घेतात. कधी कधी त्यांना याचसाठी ट्रोल देखी व्हावं लागतं. मात्र, आता आपल्या शरीरातील त्रुटींविषयी फारसा फरक पडत नाही, असा खुलासा एका अभिनेत्रीने केला आहे.
या अभिनेत्रीने बिकीनीमधला एक फोटो टाकून आता आपल्या शरीराला स्वीकारल्याचं म्हटलं आहे. ही अभिनेत्री म्हणजे इलियाना डीक्रूझ. बर्फी, रुस्तमसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये झळकलेल्या इलियानाने इन्स्टाग्रामवर एक फोटो टाकला आहे. त्यात ती लालसर गुलाबी रंगाच्या बिकिनीत दिसत आहे.
तिच्या म्हणण्यानुसार, तिने तिच्या फोनमधील सर्व फोटो एडिटिंग अॅप्लिकेशन्स डीलिट केली आहेत. ती बऱ्याच काळापासून ती बॉडी डिसमॉर्फिक डिसॉर्डर या व्याधीने ग्रस्त होती. यात माणसाला स्वतःच्या शरीररचनेच्या त्रुटी दिसू लागतात. या त्रासामुळे आपल्या मनात आत्महत्येचे विचारही येत होते, असं ती सांगते.
आधी मला वाटायचं की मी पुरेशी सडपातळ नाही. माझे हात पाय, नाकडोळे यांना नीट आकार नाही. पण, आता मी असं करत नाही. मी बिकिनीत जाडी दिसते किंवा नाही, याने मला फरक पडत नाही. मी स्वतःला आहे तशी स्वीकारू लागले आहे, असं इलियानाचं म्हणणं आहे.
View this post on Instagram




























































