
सामना ऑनलाईन । मुंबई
मुंबई आणि परिसरात गेले दोन-तीन दिवस पावसाचा शिडकाव होत असल्याने हवेत थोडा गारवा आला असला तरी ही मान्सूनच्या पावसासाठी आणखी सात दिवस वाट पाहावी लागणार आहे. हवामान विभागाने मुंबईत नैऋत्य मान्सूनच्या आगमनाच्या अंदाजाची तारीख सात दिवसांनी आणखी पुढे ढकलली आहे.
मुंबईकर आणि महाराष्ट्रातील नागरिक चातकाप्रमाणे मान्सूनच्या आगमनाची वाट पाहात आहे. मराठवाडा, विदर्भासोबतच यंदा उत्तर महाराष्ट्राला देखील दुष्काळाचे चटके बसत आहेत. त्यामुळे मान्सूनच्या पावसाकडे सारे डोळे लावून बसले आहेत. मात्र अरबी समुद्रातील वायू चक्रीवादळामुळे मान्सूनला विलंब होत असून मुंबईत पोहोचण्यास आणखी सात दिवस वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे.
IMD, Mumbai: #CycloneVayu to have an impact on the movement on the South West Monsoon, may take another seven days to reach Mumbai.
— ANI (@ANI) June 14, 2019




























































