
डीआरडीओ आणि हिंदुस्थानी नौदलाने मिळून एण्डो अॅट्मोस्फेरिक इंटरसेप्टर क्षेपणास्त्राचे ओडिशाच्या किनाऱयावरून यशस्वीरीत्या प्रक्षेपण केले आहे. या यशस्वी चाचणीमुळे नौदलाने इतिहास रचला असून हिंदुस्थानी नौदल बीएमडी क्षमता असलेल्या देशांच्या एलिट क्लबमध्ये दाखल झाला आहे. हिंदुस्थानच्या नौदलाने अशा प्रकारच्या एंडो-वातावरणातील इंटरसेप्टर क्षेपणास्त्राची पहिल्यांदाच चाचणी केली आहे. या क्षेपणास्त्राचा उपयोग आपल्याविरोधातील बॅलेस्टिक क्षेपणास्त्र निष्क्रिय करण्यासाठी करता येणार आहे.




























































