हिंदुस्थानचा संघ तब्बल सहा दशकांनंतर पाकिस्तानच्या दौऱ्यावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तब्बल सहा दशकांनंतर हिंदुस्थानचा संघ पाकिस्तानात डेव्हिस कप खेळण्यासाठी जाणार आहे. येत्या 3 आणि 4 फेब्रुवारीला इस्लामाबाद येथे होणाऱया पाकिस्तानविरुद्धच्या डेव्हिस कप टेनिस लढतीसाठी हिंदुस्थानचा सहा सदस्यीय संघ जाहीर करण्यात आला आहे. या संघात रामकुमार रामनाथन, एन श्रीराम बालाजी, युकी भांबरी, निकी कालियांदा पुनाचा, साकेत मायनेनी आणि दिग्विजय प्रताप सिंह यांचा समावेश करण्यात आला आहे. दिग्विजय हा राखीव खेळाडू आहे. रामनाथन आणि पूनाचा हे दोघे एकेरीत खेळू शकतात. भांबरी, बालाजी आणि मायनेनी या तिघांपैकी दोघे दुहेरीत पाकिस्तानशी भिडतील. संघात नसूनही रोहित राजपालकडे संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे, तर झिशान अली संघाचा प्रशिक्षक असेल. हिंदुस्थानने 1964 साली अखेरचा पाकिस्तान दौरा केला होता. या दौऱयात पाकचा 4-0 ने पराभव केला होता. विशेष म्हणजे, या स्पर्धेत हिंदुस्थानने सर्वच्या सर्व आठ सामने जिंकले आहेत.