IPL 2024 : ‘यशस्वी’ भव ! राजस्थानचा मुंबईवर दणदणीत विजय

यशस्वीला सुर गवसला आणि त्या सुरावर स्वार होत राजस्थानने मुंबईचा 9 विकटने पराभव केला. या विजयासह राजस्थान रॉयल्सने गुणतालीकेत 14 गुणांची कमाई करत अव्वल स्थान कायम ठेवल. यशस्वीने 60 चेंडूत सात षटकार आणि नऊ चौकारांच्या मदतीने नाबाद 104 धावांची शतकी खेळी केली. त्याला जॉस बटरल 25 चेंडू 35 धावा आणि कर्णधार संजू सॅमसन 28 चेंडू 38 धावा यांनी मोलाची साथ दिली.

सवाई मानसिंग स्टेडियम जोधपूरमध्ये पार पडलेल्या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथन फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र मुंबईची सुरूवात खराब झाली. अवघ्या सहा या धावसंख्येवर मुंबईचे दोन्ही सलामीवीर रोहित शर्मा (5 चेंडू 6 धावा) आणि इशान किशन (3 चेंडू 0 धावा) स्वस्तात माघारी परतले. सूर्यकुमार यादवला (8 चेंडू 10 धावा) सुद्धा मोठी धावसंख्या उभारता आली नाही. मात्र तिलक वर्मा पुन्हा एकदा संघासाठी धाऊन आला. त्याने सगळी सुत्र आपल्या हातात घेत 45 चेंडूंमध्ये 3 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने 65 धावांची खेळी केली. त्यानंतर आलेल्या नाबी (17 चेंडू 23 धावा), नेहाल वाधेरा (24 चेंडू 49 धावा) यांनी केलेल्या आक्रमक खेळीमुळे मुंबईचा संघ 9 गड्यांच्या मोबदल्यात 179 धावा करण्या यशस्वी ठरला. राजस्थाकडून गोलंदाजांचा तिखट मारा पाहायला मिळाला. संदीप शर्माने तुफान गोलंदाजी करत मुंबईचा अर्धा संघ तंबूत धाडला. संदीप शर्माने 4 षटाकांमध्ये फक्त 18 धावा देत 5 विकेट घेतल्या. तर बोल्ट 2, आवेश खान आणि चहल यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली.