कैदेतच दहशतवाद्याने तिला केले ‘प्रपोज’, एका हातात बंदूक दुसऱ्या हातात अंगठी

इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्ष कधी संपणार हे माहिती नाही. परंतु या युद्धामुळे अनेकांचे संसार उघडय़ावर पडले आहेत. इस्रायलच्या एका 18 वर्षीय तरुणी नोगा वीस हिने तिच्यावर घडलेला प्रसंग सांगितला.

एक हमासचा दहशतवादी तिच्याशी लग्न करण्यास इच्छुक होता. ही तरुणी मागील वर्षी तब्बल 50 दिवस हमासच्या कैदेमध्ये होती. नोगा वीस हिने अनेक खुलासे केले आहेत. एका अतिरेक्याने तिला अंगठी देऊन प्रपोज केले होते. अतिरेकी तिच्याशी लग्न करण्यासाठी इच्छुक होता. त्याने तिच्या आईचीदेखील नोगासोबत भेट घातली होती. तो नोगाला म्हणायचा, ती आता कायमस्वरूपी गाझामध्येच राहणार आहे. त्यामुळे तिने त्याच्या मुलांना जन्म द्यावा. नोगाने ‘द टाईम्स ऑफ इस्रायल’ला मुलाखत दिली होती. यात तिने हा खुलासा केला आहे.

सुरुवातीला मी शांततेत त्याचे प्रपोजल धुडकावू पाहत होते. पण तो हट्ट करत राहिला. त्यानंतर मात्र मी त्याच्यावर ओरडली, असे नोवा म्हणाली. इस्रायल आणि हमासमध्ये झालेल्या कराराअंतर्गत नोगाला मुक्त करण्यात आले.