
कर्नाटकातील उडुपी कॉलेजमधील हिजाबवरून सुरू झालेल्या वादाचे पडसाद आता देशभर उमटत आहेत. समाजात घडणाऱया विविध घटनांवर सडेतोड भाष्य करणाऱया गीतकार जावेद अख्तर यांनी आता या मुद्दय़ावरून आपली स्पष्ट भूमिका मांडली असून मुलींना घाबरवणाऱया जमावाचा निषेध केला आहे.
ट्विटमध्ये जावेद अख्तर यांनी म्हटलंय, ‘‘मी आतापर्यंत कधीही हिजाब किंवा बुरख्याच्या बाजूने नव्हतो. मी आजही त्यावर ठाम आहे; परंतु मुलींच्या एका छोटय़ा गटाला घाबरवण्याचा प्रयत्न करणाऱया गुंडांच्या जमावाबद्दल माझ्या मनात तिरस्काराशिवाय काही नाही. हा त्यांचा पुरुषार्थ आहे का?’’ असा सवाल जावेद अख्तर यांनी उपस्थित केला आहे.




























































