कलिना रेंजर्सची जेतेपदाची किक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई 

कलिना रेंजर्स संघाने फुटबॉलच्या रणांगणात जबरदस्त कामगिरी करीत शिवसेना शाखा क्रमांक 51 व युवाशक्ती मित्र मंडळ आयोजित गोरेगाव कला-क्रीडा महोत्सवाअंतर्गत घेण्यात आलेल्या टायगर कप या रिंक फुटबॉल स्पर्धेच्या जेतेपदावर मोहोर उमटवली. या स्पर्धेचे आयोजन नगरसेवक स्वप्नील टेंबवलकर यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. जुहू एकर्स या संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

या स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळय़ाला विभागप्रमुख-आमदार सुनील प्रभू, वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्योत्स्ना रासम, महिला विभाग संघटक नगरसेविका साधना माने, युवासेना सरचिटणीस अमोल कीर्तिकर, गोरेगाव विधानसभा उपसमन्वयक अजय नाईक, गोरेगाव विधानसभा संघटक प्रवीण माइणकर, उपविभागप्रमुख सुधाकर देसाई, माजी नगरसेविका वर्षा टेंबवलकर, शाखाप्रमुख दीपक रामाणे, शाखा संघटक लीला माने, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे व्हाइस प्रेसिडेंट अजय देसाई, प्रबोधन गोरेगावचे खजिनदार रमेश इस्वलकर, महिला विधानसभा संघटक स्नेहा गोलतकर, युवासेना राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अंकित प्रभू, उपविभागप्रमुख लक्ष्मण नेहरकर, शाखाप्रमुख-58 कमलाकांत नांदोस्कर या मान्यवरांची उपस्थिती होती.