आगामी निवडणूक लढणार : कमल हासन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ज्येष्ठ अभिनेते आणि मक्कल निधी मय्यम पक्षाचे अध्यक्ष कमल हासन यांनी ‘विक्रम’ या चित्रपटाच्या यशानिमित्ताने नुकतीच चेन्नईत एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी तामीळनाडूची आगामी निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी सांगितले. मक्कल निधी मय्यम पक्षाला पाच वर्षे पूर्ण झाली असून पक्षाची प्रगती समाधानकारक असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.