शासनाने दिलेल्या आदेशांचे पालन करा, कर्जतचे तहसीलदार विक्रम देशमुख यांचे आदेश

476

सध्या सर्वत्रच करोनाची दहशत आहे. या विषाणूचा संसर्ग पसरून नये, त्याचा प्रादुर्भाव रोखावा यासाठी यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शासनाने गर्दीच्या ठिकांणांवर बंदी घातली आहे. शासनाने दिलेल्या आदेशांचे पालन नागरिकांनी करावे असे आवाहन कर्जतचे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी केले आहे.

राज्यात संचारबंदी लागू आहे फक्त जीवनाश्यक वस्तूची दुकाने उघडी आहेत. दुकानांमध्ये गर्दी करू नका असे आवाहन केले आहे. कर्जत तालुक्यात वामनराव पै जीवन विद्या मिशन येथे उघडण्यात आलेल्या विलगीकरण कक्षात 6 जणांना परदेशातून आले आहेत म्हणून ठेवण्यात आले आहे अशी माहिती तहसीलदार देशमुख यांनी दिली. कोरोना सारख्या महाभयंकर विषाणूशी लढा देण्यासाठी शासनाने जे निर्देश दिले आहेत त्यांचे पालन करा घरामध्ये रहा घराच्या बाहेर पडू नका असे आवाहन केले आहे.

आमदार महेंद्र थोरवे यांनी कर्जत उपजिल्हा रुग्णालय येथे जाऊन कोरोना संदर्भात पाहणी करून अधिक्षक डॉ मनोज बनसोडे यांच्याकडून रुग्णालयाच्या कामकाजाची माहिती घेतली. कर्जत बाजारपेठेतील गर्दीच्या ठिकाणी जाऊन गर्दी कमी करण्याचे आवाहन केले व नागरिकांनी, जनतेने कोरोना विषाणू कडे गांभीर्याने पाहा घरा बाहेर पडू नका असे आवाहन केले.

कर्जत मध्ये 144 कलम लागू असल्याने कर्जत पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलीस गस्त घालत आहेत तसेच शहराच्या मुख्य चौकात पोलीस कर्मचारी उभे आहेत शासनाच्या आदेशाचे पालन करा फिरू नका असे आवाहन कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण भोर यांनी केले आहे. शासनाच्या निर्देशानुसार कर्जत एस टी आगार बंद ठेवण्यात आले आहे अशी माहिती एस टी आगार व्यवस्थापक शंकर यादव यांनी दि ली

आपली प्रतिक्रिया द्या