
सामना प्रतिनिधी । पारनेर
जेष्ठ समाजसेवक डॉ. अण्णासाहेब हजारे यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई हजारे यांच्या 16 व्या स्मृतिदिनानिमित्त सोमवारी 19 नोव्हेबररोजी राळेगण सिद्धी परिवाराने आई या विषयावर “काव्यांजली” या काव्यमैफलींच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम सायंकाळी 7 वाजता हिंद स्वराज ट्रस्टच्या नवलभाऊ फिरोदिया सभागृह येथे होईल. काव्यांजली कार्यक्रमासाठी कवी गणेश मरकड (तहसिलदार, पारनेर), नारायण पुरी (नांदेड) , अरुण पवार (बीड), अनंत राऊत (अकोला), अंकुश आरेकर (सोलापूर), भरत दौंडकर (राळेगणसिद्धी ) हे नामवंत कवी सहभागी होणार आहेत. त्यामुळे काव्यप्रेमींसाठी ही खरी पर्वणी ठरणार आहे.
काव्यप्रेमींसाठी मातोश्री लक्ष्मीबाई बाबुराव हजारे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात महाराष्ट्रातील नामांकित कवींना एका व्यासपीठावर आणण्याचे काम उद्योजक सुरेश पठारे, दादा पठारे, डॉ. गणेश पोटे, उपसरपंच लाभेष औटी, सुनील हजारे, डॉ. धनंजय पोटे, शरद मापारी, सुनील मापारी यांनी केले. आई या विषयावर आयोजित केलेल्या “काव्यांजली” कवी काव्यमैफलीस पारनेर तालुक्यातील व अहमदनगर जिल्ह्यातील कवी प्रेमींनी या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राळेगणसिद्धीचे सरपंच प्रभावती पठारे यांनी केले आहे.
































































