ग्रामीण स्वच्छतेसाठी जिल्हा परिषदेचे ‘पुढचे पाऊल’…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। सिंधुदुर्गनगरी

स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत स्वप्रेरणेने ग्रामपंचायतस्तरावर स्वच्छता क्षेत्रात काम करणा-या तरुणांना आता प्रोत्साहन मानधन मिळणार आहे. ज्या तरुणांना स्वच्छता क्षेत्रात ग्रामपंचायत स्तरावर काम करावयाचे आहे. त्यांनी आपल्या ग्रामपंचायत कार्यालयात स्वच्छग्रही म्हणून नावनोंदणी करावी असे आवाहन पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे यांनी केले आहे. या माध्यमातून स्वच्छतेत सातत्य राखण्यासाठी जिल्हा परिषदेने ‘पुढचे पाऊल’ टाकले आहे.

या करीता महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग यांनी 20 डिसेंबर 2018 रोजी प्रसिध्द केलेल्या शासन निर्णयान्वये स्वच्छग्रही करीता प्रोत्साहनपर मानधन निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये नादुरुस्त शौचालय संपूर्णपणे दुरुस्त केल्याची खात्री केल्यास प्रती दुरुस्त शौचालय रक्कम 25 रुपये, एका शोष खड्ड्याच्या शौचालयाचे दोन खड्ड्यात रुपांतर करणे किंवा सेंप्टीक शौचालयास शोषखड्डा बांधकाम करणेस प्रवृत्त करणे करीता 50 रुपये, सार्वजनिक शौचालयाची योग्यरितीने देखभाल व स्वच्छता झाल्याची खात्री करणे (15 दिवसातून एकदा) यासाठी 100 रुपये, शौचालय, ग्रामपंचायत स्तरावर सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प बांधकाम करणे प्रत्येक प्रकल्प 2 हजार रुपये, कच-याचे ओला व सुका मध्ये वर्गिकरण करणे प्रति कुटुंब 10 रुपये, गावपातळीवर गांडुळखत प्रकल्पाची उभारणी व व्यवस्थापन प्रती प्रकल्प 1 हजार रुपये, कुटुंबस्तरावर गांडुळखत किंवा कंपोस्ट खत प्रकल्प करणे प्रती कुटुंब 25 रुपये, गावात एकाचवेळी पक्क्या गटाराचे बांधकाम करणे 1 हजार रुपये, वैयक्तीक स्तरावर शोषखड्ड्याचे बांधकाम करणे प्रती खड्डा 25 रुपये, सामुहिक कपोष्ट खड्ड्याचे बाधकाम करणे 100 रुपये, सामुहिक बायोगॅस बांधकाम करणे १ हजार रुपये, गावातील नळपाणी पुरवठा करणा-या पिण्याच्या पाण्याच्या टाकीची स्वच्छता झाल्याची दर तीन महिन्यांनी खात्री करणे 100 रुपये.

गावातील सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ असल्याची 15 दिवसानी खात्री करणे 50 रुपये, शाश्वत स्वच्छता बाबत ग्रामस्थ, सरपच, ग्रामसेवक यांच्या बैठकीचे आयोजन करणे 50 रुपये, स्थानिक संस्थात्मक इमारतीतील शौचालयाची दुरुस्ती करुन घेणे 200 रुपये, हागणदारी मुक्त अधिक व शाश्वत स्वच्छता बाबत प्रचार प्रसिध्दी करणेकरीता 100 रुपये, गावातील नविन कुटुबाना शौचालय बाधकाम करण्याकरीता प्रवृत्त करणे करीता ग्रामसभेत ठराव पारित करणे 100 रुपये, गावातील नविन कुटुबाना शौचालय बाधकाम करण्याकरीता प्रवृत्त करणे 25 रुपये, शाळा अंगणवाडी येथे नखे कापणे, हात धुवा याबाबत प्रात्याक्षिक देणे याकरीता 25 रुपये, प्रमाणे प्रति महा मानधन निश्चित करण्यात आले आहे.

तरी ग्रामपंचायत स्तरावर स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत स्वच्छाग्रही म्हणून काम करण्यास इच्छुक असलेल्या युवक – युवतीनी आपल्या ग्रामपंचायत कार्यालयात सपर्क साधण्याचे आवाहन कमलाकर रणदिवे यांनी केले आहे.