स्वदेशी ‘कू’ ऍपने पार केला दोन कोटींचा टप्पा

ट्विटरला तगडी टक्कर देण्यासाठी सुरू झालेल्या स्वदेशी ‘कू’ ऍपने आता दोन कोटी युजर्सचा टप्पा गाठला आहे. मार्च 2020 मध्ये देशातील पहिले बहुभाषिक मायक्रोब्लॉगिग कू ऍप लाँच झाले. सुरुवातीला कू ऍप कन्नड भाषेत होते. त्यानंतर ते हिंदी, मराठी, गुजराती, तमिळ, तेलगू, पंजाबी, बंगाली, इंग्रजीसह 10 भाषांमध्ये सुरू झाले.

कन्नड भाषेत सुरू झालेल्या ऍपने 2021 मध्ये चांगले यश मिळवले. डिसेंबरमध्ये कू ऍपचे दोन कोटी डाऊनलोड झाले. याआधी ऑक्टोबरमध्ये दीड कोटीचा टप्पा पूर्ण झाला होता. बॉलीवूडमधील अनेक कलाकार कू ऍपवर सक्रिय आहेत.