
सामना प्रतिनिधी। कुडाळ
हिंदूहृदयसम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून कुडाळ तालुका शिवसेना सरपंच- उपसरपंच संघटनेच्या वतीने बुधवारी आनंदाश्रय, अणाव या वृद्धाश्रमाला व्हील चेअर आणि कमोड चेअर भेट देण्यात आले.
शिवसेनेच्या 80 समाजकारण व 20 राजकारण या सूत्राचे पालन करत सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम या संघटनेच्या माध्यमातून करण्यात आले. यावेळी आश्रमाचे बबनकाका परब यांच्याकडे हे साहित्य सुपूर्द करण्यात आले. यावेळी महीला आघाडी प्रमुख जान्हवी सावंत, पं. स. सदस्य जयभारत पालव, सरपंच संघटना तालुकाध्यक्ष तथा कुंदे सरपंच सचिन कदम, पावशी सरपंच बाळा कोरगांवकर, हुमरस सरपंच अनुप नाईक, नेरूर कर्याद नारुर सरपंच सागर म्हाडगुत, पोखरण सरपंच संकेत पांगम, मांडकुली सरपंच तुषार सामंत, हिर्लोक सरपंच कन्याश्री मेस्त्री, उपसरपंच नरेंद्र राणे, हुमरमळा सरपंच. जान्हवी पालव, सरंबळ सरपंच मनाली साटम, झाराप सरपंच स्वाती तेंडोलकर, आंबडपाल सरपंच प्रणिता नाईक, बिबवणे उपसरपंच . सोनी बिबवणेकर आदी उपस्थित होते. संघटनेच्या पदाधिका-यांनी आश्रमातील अडीअडचणी जाणून घेत सहकार्याची ग्वाही दिली. तसेच आजी- आजोबांशी सर्वांनी संवादही साधला. बबनकाका परब यांनी सरपंच-उपसरपंच संघटनेचे आभार मानले.

































































