
सामना प्रतिनिधी। कुडाळ
परमपूज्य विनायक अण्णा राऊळ महाराज महाविद्यालय साळगांवच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या सात दिवसीय निवासी श्रमसंस्कार शिबिर कालावधीत आदर्श स्वयंसेविका पुरस्कार मृणाल सावंत व मंजुषा पवार आदर्श स्वयंसेवक पुरस्कार रोहित शेटकर याना देऊन गौरविण्यात आले.
पिंगुळी येथील जिल्हा परिषद शाळा शासनाचे पाणी येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सात दिवसीय निवासी श्रमसंस्कार शिबिर नुकतेच संपन्न झाले. या कालावधीत एनएसएस स्वयंसेवकांनी शाळा स्वच्छता, मंदिर स्वच्छता, उद्यान स्वच्छता इत्यादी स्वच्छतेचे उपक्रम राबविले तसेच शोषखड्डे,गटारे साफ करणे इत्यादी च्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबविले. रोज संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे एनएसएस स्वयंसेवकांनी ग्रामस्थांची मने जिंकली.
या शिबिरामध्ये एनएसएस कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक एच.एम.धुरी यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्यासोबत महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. व्ही. व्ही. देसाई यांनीदेखील स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले.
शेवटच्या दिवशी म्हणजे समारोप समारंभात व्यासपीठावर पिंगुळी गावच्या सरपंच निर्मला पालकर तसेच पिंगुळी येथील राऊळ महाराज ट्रस्टचे दशरथ राऊळ तसेच ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र सडवेलकर तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका.मृदुला सावंत, सहाय्यक रेश्मा गोसावी, अंगणवाडी सेविका सौ. चव्हाण, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ देसाई तसेच एन.एस.एस कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक धुरी, सचिन पाटकर तसेच शिबिरात विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या स्वयंसेवकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. विशेष प्राविण्य पुरस्कार तन्मय वालावलकर व अश्विनी साटेलकर, सांघिक कार्य करणाऱ्या गटाचा देखील पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये नाव रांगणा गड,गटप्रमुख रोहित शेटकर यांचा गौरव करण्यात आला.
































































