एल अँड टी फायनान्शियल सर्व्हिसेसची तात्काळ कर्ज वितरणात विक्रमी वाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एल अँड टी फायनान्शियल सर्व्हिसेसने तत्काळ कर्ज वितरणात अतिशय भरभक्कम अशी वाढ नोंदविली आहे. लक्ष्य 2026 या आपल्या धोरणात्मक योजनेनुसार ग्राहक केंद्रीत रिटेल फायनान्स कंपनी बनण्याच्या दिशेने सुरु असलेली वाटचाल या वाढीतून प्रतिबिंबित होताना दिसत आहे. सप्टेंबर 2022 मध्ये या कर्जप्रकाराचा श्रीगणेशा केल्यानंतर तत्काळ कर्ज वितरणात जबरदस्त वाढ नोंदविली गेली आहे. जानेवारी 2023 अखेर कंपनीने 91 कोटी 40 लाख रुपयांचे कर्ज वितरण केले आहे. ऑक्टोबर 2022 च्या अखेरीस कर्ज वितरण 22 कोटी रुपये होते.

तात्काळ कर्ज श्रेणींतर्गत ग्राहकाचा अर्ज अवघ्या सात मिनिटांत घेतला जातो. त्यामुळे त्याला अतिशय झटपट कार्यवाही, समाधान आणि दिलासा मिळतो. जे या कर्ज प्रकारासाठी मुख्य मूल्ये आहेत. ही एक पूर्णपणे पेपरलेस कर्ज प्रक्रिया आहे. याद्वारे ग्राहकांना 50 हजार ते सात लाख रुपयांदरम्यानचे कर्ज मिळू शकते आणि त्यासाठी परतफेड कालावधी 12 ते 48 महिने निश्चित केलेला असतो.

एल अँड टी फायनान्शियल सर्व्हिसेसचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दिनानाथ दुभाषी या नवीन कर्ज सेवेबद्दल म्हणाले की, ‘आम्ही रिटेल कर्जाचा पोर्टफोलिओ विस्तारण्यासाठी ग्राहकांच्या गरजा, सर्वोत्तम उत्पादने आणि अर्जावर तत्काळ निर्णय घेण्यासाठी डिजीटल आणि डेटा विश्लेषण पध्दतींचा वापर यावर अधिकाधिक लक्ष केंद्रीत करत ग्राहकसेवा आणि अतिशय वेगाने निर्णय यात सुधारणा घडवून आणल्या आहेत. लक्ष्य 2026 योजनेतील उद्दीष्ट्ये गाठण्यासाठी आम्ही योग्य दिशेने वाटचाल करत असल्याचे गत तिमाहीतील आर्थिक निकालातून स्पष्ट होते. तत्काळ कर्जाला मंजुरीसाठी आम्हाला लागणारा वेळ हा उद्योगक्षेत्रात सर्वाधिक कमी वेळांपैकी एक आहे. दरमहा आमच्या वाढणाऱ्या ग्राहकांची संख्या पाहता आमच्या या नवीन कर्ज प्रकाराच्या कार्यक्षमतेला ग्राहकांनी प्रतिसाद दिला आहे. आम्ही वितरित केलेल्या कर्जापैकी 50 टक्क्यांपेक्षा अधिक कर्ज हे 25 ते 35 वयोगटातील ग्राहकांना दिलेले आहे आणि अन्य वित्तीय संस्थांचा कित्ता न गिरवता आम्ही आमच्या नवीन ग्राहकांनासुध्दा अतिशय कमी वेळेत कर्जपुरवठा करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.