कोरोनासोबत निर्बंध वाढले, दिल्ली-लखनौ-मुंबई सारख्या महानगरांतून मजुर पुन्हा गावी निघाले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढले असून दिवसाला लाखोंच्या घरात रुग्ण आढळत आहे. अशा वेळी अनेक राज्यांची निर्बंध आणि रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. गेल्या वर्षी लॉकडाऊन जारी झाल्यानंतर सर्वाधिक फटका मजुरांना बसला होता. आताही अनेक राज्यांनी निर्बंध लावल्याने मजुर पुन्हा आपल्या घराकडे निघाले आहेत. विविध वृत्तवाहिन्या आणि संकेतस्थळांनी यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध केलं आहे आहे.

विविध राज्यांच्या महानगरातील मजुरांनी आता घरची वाट पकडली आहे असून दिल्ली, लखनौ आणि पुण्यातील स्थानकात गर्दी झाल्याची पाहायला मिळत होती. आता मुंबईतही मजुरांनी गावी परतण्यासाठी मुख्य स्थानकं गाठली आहेत.

दरम्यान, स्टेशनवर होणारी गर्दी टाळण्यासाठी लोकमान्य टिळक टर्मिनस, कल्याण, ठाणे, दादर, पनवेल, छत्रपती शिवाजी टर्मिनस वर आता प्लॅटफॉर्म तिकीट मिळणार नाही, असे मध्य रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.

मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनसवर अनेक प्रवासी उभे होते. हे लक्षात घेत रेल्वे प्रशासनाने खबरदारी घेऊन उद्घोषणेद्वारे त्यांचे मार्गदर्शन केल्याचे पाहायला मिळाले.

काही दिवसांपूर्वी दिल्लीच्या आनंद विहार बस स्थानकाजवळ मोठ्या प्रमाणात बिहारच्या मजुरांनी गर्दी केली होती. तसेच मागच्या वर्षी लॉकडाऊनच्या वेळी जे हाल झाले होते तसे पुन्हा होऊ नये म्हणून आपण गावी जात असल्याचे त्यांनी म्हटले होते. हीच परिस्थिती पुणे आणि देशातील काही महानगरांची होती.