
सामना प्रतिनिधी। लातूर
जिल्हासंपर्क प्रमुख सुनिल वेंगुर्लेकर यांच्या उपस्थितीत मुरुड येथे बुथ प्रमुखांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी निवडणूकीसाठी बुथप्रमुखांची नियुक्ती तातडीने करुन सक्षमपणे निवडणूकीस आपणास सामोरे जावयाचे आहे असे प्रतिपादन सुनिल वेंगुर्लेकर यांनी केले.
शिवसेना पक्षप्रमुखांनी निवडणूक जिंकायची आणि विधानभवनावर भगवा फडकवण्याचा निर्धार केलेला आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्यातही सक्षम आणि मजबुत पक्षबांधणी करावी, निवडणूकीत बुथप्रमुखाचे काम अत्यंत महत्वाचे आहे. त्यामुळे तातडीने सर्व बुथप्रमुखांच्या नेमणूका पुर्ण कराव्यात. शिवसेनेने 80 टक्के समाजकारणाच्या बळावर राज्यातील लोकांच्या मनात आपली विश्वासार्हता प्राप्त केलेली आहे. दुष्काळ असो की नैसर्गिक आपत्ती शिवसेनेचा खंबीरपणे सर्वांच्या पाठीशी उभी राहते. एकसंघ राहून सर्वांनी भगवा फडकवण्यासाठी आपले योगदान द्यावे असे अवाहनही त्यांनी केले.
यावेळी प्रशांत भंडारी, संतोश देवकर, दत्तात्रय शिंदे, रवी सुर्यवंशी, गोकूळदास चांडक, अक्षय घोगरे, स्वप्नील नाडे, जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी, उपजिल्हाप्रमुख बी.एन.डोंगरे, नामदेव चाळक, रमेश पाटील, राजकुमार सुरवसे, विमल कोळी, हनुमंत तिरुके, विजय झाडके, प्रकाश अंधारे, राजाभाऊ गाडे, बाळासाहेब खराडे यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.
































































