24 लाखांचे हिरे चोरणाऱ्या लोडरला अटक 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

24 लाख रुपयांचे हिरे चोरीप्रकरणी एका खासगी पुरीयर कंपनीत काम करणाऱया लोडरला सहार पोलिसांनी बेड्या ठोकल्या. रोहित कोटियन असे त्याचे नाव आहे. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

तक्रारदार हे अंधेरीच्या एमआयडीसी येथे खासगी कंपनीत मॅनेजर म्हणून काम करतात. त्यांचे बीकेसीच्या भारत डायमंड बोर्समध्येदेखील कार्यालय आहे. त्याच ठिकाणी वर्पशॉप आणि हिऱयांना कटिंग, पॉलिशचे काम चालते. सप्टेंबर महिन्यात ऑस्ट्रेलिया येथून हिरे एका खासगी पंपनीच्या माध्यमातून हिंदुस्थानात पाठवले होते. त्या हिऱयाचे पार्सल 29 सप्टेंबरला मुंबईत आले. मुंबईत आल्यावर ते हिरे तक्रारदार यांच्या कार्यालयात पाठवण्याची प्रोसेस सुरू होती. तेव्हा ते हिऱयाचे पार्सल तुटलेल्या अवस्थेत पंपनीच्या सिक्युरिटी मॅनेजरला दिसले. त्यानी त्या बॉक्सची तपासणी केली असता त्यात 32 हजार 383 अमेरिकन डॉलरचे (हिंदुस्थानी किमतीनुसार 24 लाख) रुपये किमतीचे हिरे चोरीला गेले होते. चोरीप्रकरणी सहार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. सहार पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंद करून तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी पुरिअर पंपनीच्या कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यानंतर पोलिसांनी रोहितला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान रोहितने हिरे चोरीची पोलिसांना कबुली दिली.