स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकला! निवडणूक आयोगाला कळवणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात अनेक जिल्ह्यांत मोठय़ा प्रमाणावर अतिवृष्टी आहे. अशा परिस्थितीत पावसाळ्यात निवडणुका घेणे सोयीचे होणार नाही. त्यामुळे या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात अशी विनंती निवडणूक आयोगाला करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी ओबीसी आरक्षणावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. ओबीसी आरक्षणाची 12 तारीख आहे. अटॉर्नी जनरल तुषार मेहतांना भेटलो. ओबीसी प्रश्नी त्यांना सर्वोच्च न्यायालयात राज्याची बाजू मांडण्याची विनंती केली, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. त्यामुळे आता
12 तारखेला काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.