
रेल्वे प्रवासात वकिलाची बॅग चोरणाऱ्या सराईताला लोहमार्ग पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून 6 लाख ७० हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.यांगेश रमेश माने (वय २७, रा. गौतमनगर, ता. दौड, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
जबलपूर ते पुणे एक्सप्रेसने रेल्वेने फिर्यादी पिंपरीया ते पुणे असा प्रवास करत होते. त्यावेळी रेल्वे केडगाव ते यवत दरम्यान आल्यानंतर वकिलाच्या हॅडबॅकची चोरी झाली होती. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी एका सराईताला बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्या जवळून 140 ग्रॅम वजनाची सोन्याची लगड, एक मोबाईल असा 6 लाख 70 हजारंचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
त्याच्यावर पुणे लोहमार्ग पोलिस ठाणे, नगर पोलिस ठाणे, दौड लोहमार्ग पोलिस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत. लोहमार्ग पुणे पोलिस अधीक्षक सदानंद वायसे पाटील, अपर पोलिस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलिस अधिकारी, श्रीकांत क्षीरसागर, लोहमार्गच्या स्थानिक गुन्हे शाखेचे मौला सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक बी. एस. अंतरकर यांच्या पथकाने ही कारवाई केली. पोलिस अधीक्षक वायसे- पाटील यांच्या हस्ते जप्तमाल तक्रारदारांना परत देण्यात आला.
































































