मुंबईतील लढतींचे चित्र स्पष्ट

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांत निवडणूक होत आहे. यामध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीच्या प्रमुख उमेदवारांसह छोटे-मोठे राजकीय पक्ष, अपक्ष असे मिळून 116 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून सर्वाधिक 27 उमेदवार निवडणुकीत उभे आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी 20 मे रोजी निवडणूक होत आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मुंबईतील सहा मतदारसंघात निवडणुकीसाठी अर्ज दाखल करणाऱ्या 116 उमेदवारांनी आपले अर्ज कायम ठेवले. त्यांनी दिलेल्या पसंतीनुसार निवडणूक चिन्हाचे वाटप आज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून करण्यात आले. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशीच लढत मुंबईतील सर्व मतदारसंघात होणार आहे.

अशा होणार लढती
उत्तर पूर्व मुंबई – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे संजय दिना पाटील विरुद्ध भाजपचे मिहीर कोटेचा.
उत्तर पश्चिम मुंबई – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अमोल किर्तीकर विरुद्ध शिंदे गटाचे रविंद्र वायकर.
दक्षिण मुंबई – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विद्यमान खासदार अरविंद सावंत विरुद्ध शिंदे गटाच्या यामिनी जाधव.
दक्षिण मध्य मुंबई – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अनिल देसाई विरुद्ध शिंदे गटाचे राहुल शेवाळे.
उत्तर मुंबई – काँग्रेसचे भूषण पाटील विरुद्ध भाजपचे पियुष गोयल.
उत्तर मध्य मुंबई – काँग्रेसच्या प्रा. वर्षा गायकवाड विरुद्ध भाजपचे अॅड. उज्वल निकम.

– उत्तर मध्य मुंबईतून सर्वाधिक 27
– उत्तर पश्चिम मतदारसंघातून 21
– उत्तर पूर्व मुंबई 20 n उत्तर मुंबई 19
– दक्षिण मध्य 15 n दक्षिण मुंबईतून 14