
मध्य प्रदेशच्या मंदसौर येथील तोला खेडी येथे चंबळ नदीत सात जण बुडाल्याचं वृत्त आहे. यापैकी दोन जणांना वाचवण्यात यश आलं असून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या सात जणांपैकी सहा महिला होत्या.
नदीच्या परिसरातील शेतांमध्ये काम करणाऱ्या महिला पुन्हा गावात परतत असताना नदीच्या मार्गाने परतत होत्या. त्यावेळी ही दुर्घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि एसडीआरफची पथकं बचाव कार्यासाठी आले.
संध्याकाळी ही दुर्घटना घडल्याने अंधारात बचावकार्य सुरू होतं. ग्रामस्थांच्या मदतीने दोन जणींना वाचवण्यात यश आलं आहे. तर तीन जणींचा मृत्यू झाला आहे. उर्वरित दोघांचा शोध सुरू आहे.




























































