
देशात कोरोना हाहाकार माजवला आहे दिवसेंदिवस मृतांचा आकडा वाढत चालला आहे. गेल्या 24 तासात देशात तब्बल दोन हजार कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला तर दोन लाख 95 हजार कोरोनाग्रस्तांची वाढ झाली आहे. एकीकडे मृतांचा आकडा वाढत असताना मध्यप्रदेश सरकार मृतांची संख्या लपवत असल्याचे समोर आले आहे. टाईम्स नाऊने याबाबत वृत्त दिले आहे.
मंगळवारी भोपाळमधील एक स्मशानगृहात सरकारी आकडेवारीनुसार तीन मृतदेहांवर अंत्यसंस्कार झाले मात्र प्रत्यक्षात तेथे तब्बल 94 मृतदेहांवर अंत्यसंस्कार झाल्याचे समोर आले आहे. दोन्ही आकड्यांमधील ही तफावत फारच मोठी असून मध्यप्रदेश सरकार आकडेवारी लपवत नाही असा आरोप केला जात आहे.
मध्यप्रदेश मध्ये मृतांचा आकडा गेल्या काही दिवसात वाढत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे स्मशानभूमीत देखील मृतांच्या नातेवाइकांना चार ते पाच तास वाट पाहावी लागत आहे स्मशानभूमी बाहेर रांगा लागल्याचे चित्र समोर आले आहे मात्र सरकारी आपल्या नुसार भोपाळमधील एका स्मशान ग्राहक फक्त तीन मृत्यू झाल्याचे तीन अंत्यसंस्कार झाल्याचे म्हटले आहे प्रत्यक्षात मात्र तेथे मंगळवारी 94 मृतदेहांवर अंत्यसंस्कार झाले.
मंगळवारी मध्यप्रदेश मध्ये 12727 कोरोनाग्रस्त आदळून आले असून एकूण आकडा या 4,33,000 च्या पार पोहोचला आहे. आत्तापर्यंत राज्यात 4714 जणांचा मृत्यू झाला आहे.




























































