राज्यात 2,229 तर मुंबईत 339 कोरोना रुग्ण  

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात आज दिवसभरात 2 हजार 229 रुग्ण सापडले असून 4 जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात 2 हजार 594 जण कोरोनामुक्त झाले असून सक्रीय रुग्णांची संख्या 16 हजार 553 वर पोहोचली आहे. दरम्यान, मुंबईतही आज दिवसभरात 339 रुग्ण सापडले तर दोघा जणांचा मृत्यू झाला. 538 जण कोरोनामुक्त झाले तर सक्रीय रुग्णांची संख्या आणखी कमी होऊन 2 हजार 805 वर पोहोचली आहे.