महाराष्ट्राची हास्यजत्राचा नवा हंगाम 14 ऑगस्टपासून सुरू होणार

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा विनोदी कार्यक्रम सोनी मराठीवर पुन्हा सुरू होणार आहे. या कार्यक्रमाचा नवा हंगाम 14 ऑगस्टपासून सुरू होणार आहे.

या कार्यक्रमाची विशेष बाब म्हणजे सोनी मराठी वाहिनी आणि ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या दोघांची सुरुवात एकाच दिवशी झाली होती. या कार्यक्रम गाजला असून या कार्यक्रमाचा एक मोठा चाहता वर्ग आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमाला पाच वर्षं पूर्ण झाली आहेत.

14 ऑगस्टपासून, सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता सोनी मराठी वाहिनीवर हा कार्यक्रम पाहता येईल.

फिल्टर पाड्याचा बच्चन असो किंवा कोळी वाड्याची रेखा, लॉली असो किंवा शंकऱ्या-शितलीची लव्ह स्टोरी. यातल्या सगळ्याच व्यक्तिरेखा लोकप्रिय झाल्या आहेत.

अभिनेता गौरव मोरे, प्रसाद खांडेकर, समीर चौगुले , दत्तू मोरे, अभिनेत्री वनिता खरात, नम्रता संभेराव आदी कलाकारांना या हास्यजत्रेने एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे लेखक, दिग्दर्शक, निर्माते असलेल्या सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी यांनी हा कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी बरीच मेहनत घेतली आहे.

दर दिवशी नव्या जोमाने केलेले भन्नाट विनोदी स्कीट, सद्यस्थितीवर केलेले तिरकस भाष्य आणि परीक्षकांपासून निर्मात्यांपर्यंत सर्वांवर केलेले विनोद हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले.