मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्कता बाळगत घरी राहावे – मंत्री विजय वडेट्टीवार

मंगळवारपासून मुंबई, ठाणे, पालघरसह राज्यात मुसळधार पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे. अशातच अतिवृष्टीमुळे मुंबई, ठाणे, पालघर परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे, काही ठिकाणी घरामध्ये पाणी गेले आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी सतर्क राहून आपल्या घरीच राहावे, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. या संपूर्ण परिस्थितीवर आपत्ती व्यवस्थापन लक्ष ठेवून असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

मुंबईकरांची दाणादाण, गेल्या 24 तासात पडला 26 वर्षातला सप्टेंबरमधील विक्रमी पाऊस

आपली प्रतिक्रिया द्या