
सध्या डबल इंजिन सरकार असल्याचे सांगत गतीमान विकासाचा दावा शिंदे सरकारकडून केला जात आहे. मात्र हा दावा सफशेल खोटा आहे. महागाई, बेरोजगारी वाढली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या माध्यमातून डबल इंजिन सरकारला ‘रेड सिग्नल दाखवण्याची’ गरज असल्याचे काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतून जनतेचे मतपरिवर्तन होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे विधान परिषद, पोटनिवडणूक आणि बाजार समितीमुळे आता विजयाची हॅट्ट्रिक झाली आहे. तर दिशाहीन सरकारच्या कारभारामुळे महाराष्ट्र अंधारात चालला आहे. असे असताना महानगरपालिका ताब्यात देऊन ट्रिपल इंजिन सरकार चालवण्याचे भाजपचे मनसुबे आहेत. पालिकेच्या 92 हजार कोटींच्या ठेवींवर त्यांचा डोळा आहे. मात्र अंधारात जाणारा महाराष्ट्र वाचवण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून पुढील प्रत्येक निडवणुकीत एकजूट दाखलून डबल इंजिनला रेड सिग्नल दाखवण्याची गरज असल्याचेही चव्हाण म्हणाले.





























































