शिवाजी पार्कात रंगणार मल्लखांबचा पहिला वर्ल्ड कप, 19 देशांत रस्सीखेच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जयेंद्र लोंढे  । मुंबई 

मल्लखांब हा महाराष्ट्राच्या मातीतला खेळ आता सातासमुद्रापार झेप घेऊ लागलाय. गेल्या काही वर्षांत 34 देशांत पाय रोवण्यात यशस्वी ठरलेल्या या खेळाचा पहिलावहिला वर्ल्ड कप मुंबईतील शिवाजी पार्क येथे होणार आहे. श्री समर्थ व्यायाम मंदिर व विश्व मल्लखांब संघटना यांच्या पुढाकाराने होणारी ही स्पर्धा पुढील महिन्यात 16, 17 फेब्रुवारीला रंगणार आहे. यात 19 देशांचे खेळाडू अजिंक्यपदासाठी सर्वस्व पणाला लावतील. राज्यापासून केंद्रापर्यंत सर्वच स्तरांतून आर्थिक मदत मिळण्यात अपयश येत असल्यामुळे वर्ल्ड कपसारख्या मोठ्या स्पर्धेच्या आयोजनासाठी श्री समर्थ व्यायाम मंदिराने स्वतःहून पुढाकार घेतलाय  ही वाखाणण्याजोगी बाब.

आर्थिक गणितं जुळेनात…

मल्लखांब वर्ल्ड कपच्या आयोजनाचे इंद्रधनुष्य श्री समर्थ व्यायाम मंदिर व विश्व मल्लखांब संघटना यांनी उचलले खरे, पण ही स्पर्धा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. यात सहभागी होणार्‍या देशांतील प्रशिक्षकांपासून खेळाडूंपर्यंतचा मुंबई विमानतळावर उतरल्यापासूनचा सर्व खर्च दोघांना करावा लागणार आहे. यासाठी जवळपास दोन कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. उदय देशपांडे आर्थिक गणितं जुळवण्यासाठी जिवाचे रान करताहेत, पण सध्या तरी त्यांना खडतर प्रवासामधूनच जावे लागत आहे.

वातानुकूलित मंडपात रंगणार खेळ

जगभरातील खेळाडूंना मल्लखांबच्या वर्ल्ड कपमध्ये चांगल्या वातावरणात खेळता यावे यासाठी आयोजकांकडून प्रयत्न करण्यात येणार आहेत. यासाठी वातानुकूलित मंडप तयार करण्यात येणार आहे. यामुळे कोणत्याही देशातील खेळाडूंवर मैदानात कामगिरी करताना अन्याय होणार नाही. वातानुकूलित मंडपामुळे खेळाडूंना एकाच तापमानात, प्रकाशात आपले कलागुण दाखवता येतील. तसेच त्यांना बाहेरील वाहनांच्या आवाजाचा त्रास होणार नाही.

या देशांचा सहभाग

हिंदुस्थान, नेपाळ, मलेशिया, इंडोनेशिया, सिंगापूर, व्हिएतनाम, जपान, नेदरलॅण्ड, हाँगकाँग, इटली, फिलिपाइन्स, फ्रान्स, इराण, अर्जेंटिना, जर्मनी, ऑस्ट्रिया, स्पेन, यूके, यूएसए.

अशी झाली पंचांची निवड

मल्लखांब वर्ल्ड कपसाठी ज्या पंचांना संधी देण्यात येणार आहे त्यांची निवड ऑनलाइन शिक्षणानंतरच्या परीक्षेनंतर करण्यात आली. 12 ऑगस्ट ते 4 नोव्हेंबर व 17 ते 27 डिसेंबर 2018 या कालावधीत पंच वर्ग घेण्यात आले. उदय देशपांडे यांनी यात मार्गदर्शन केले. या दोन्ही वर्गातील सर्वोत्तम व्यक्तींना संभाव्य पंचांच्या यादीत स्थान देण्यात आले आहे. अंतिम निवड थोड्या दिवसांत करण्यात येईल. या स्पर्धेतील खेळाडूंची कामगिरी चार पंच आणि एक गुणलेखक यांच्या गुणांवर अवलंबून असणार आहे.

नव्या नियमांचा अवलंब

मल्लखांब वर्ल्ड कपमध्ये नव्या नियमांचा अवलंब करण्यात येणार आहे. यात सहभागी होणारी मुले व मुली या दोघांनाही रोप व पोल या दोन्हीमध्ये आपला खेळ दाखवता येणार आहे. प्रत्येक संघात प्रत्येकी सहा मुले व मुली असणे अनिवार्य असणार आहे. तसेच यात सहभागी होणार्‍या खेळाडूचे किमान वय 12 वर्षे असणार आहे.

कोणाचीही मदत नाही – श्रेयस म्हसकर

मल्लखांब हा महाराष्ट्राचा सर्वात जुना खेळ. या खेळाचा पहिला वर्ल्ड कप मुंबईत होतोय याचा आनंद मोठा आहे, मात्र या खेळाला अद्याप राजाश्रय मिळालेला नाही. श्री समर्थ व्यायाम मंदिराने इतक्या मोठ्या स्पर्धेच्या आयोजनाचा भार उचललेला आहे. वर्ल्ड कप थोड्या दिवसांवर येऊन ठेपलाय. कोणाकडूनही अद्याप मदत मिळालेली नाही, असे स्पष्ट मत महाराष्ट्र मल्लखांब असोसिएशनचे सेक्रेटरी श्रेयस म्हसकर यांनी यावेळी व्यक्त केले.