दांडिया खेळताना झालेल्या वादातून तरुणावर हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाच दिवसांपूर्वी दांडिया खेळताना झालेल्या किरकोळ भांडणाचा राग मनात धरून एका तरुणावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना मानखुर्द येथे घडली. याप्रकरणी मानखुर्द पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

दीपक कनोजिया (32) या तरुणावर प्राणघातक हल्ला झाला. पाच दिवसांपूर्वी दीपक आणि आरोपी दिलीपकुमार साहू (23) यांच्यात दांडिया खेळताना किरकोळ वाद झाला होता. तो राग मनात धरून आरोपी दिलीपने दीपक त्याच्या घराजवळ असताना त्याला गाठले आणि सोबत आणलेल्या चाकूने दीपकच्या पोट व पाठीवर वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने दीपक या हल्ल्यातून बचावला. याप्रकरणी दिलीपला अटक केली असून त्याला कोर्टात हजर केले असता 14 तारखेपर्यंत कोठडी सुनावण्यात आली असल्याचे मानखुर्द पोलिसांनी सांगितले.