हेलिकॉप्टरसे गिरे….पॅराशूट पे उलटे लटके…वाचा नेमके काय झाले…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सध्या सोशल मिडीयावर अनेक गोष्टी आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील अनेक व्हिडीओ आश्चर्यचकीत करणारे असतात. असाच एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक पॅराशूट हेलकॉप्टरच्या टेल रोटर म्हणजे लँडिंग स्टँडला अटकते. त्यानंतर पॅराशूटमध्ये असलेली व्यक्ती आकाशातच उलटी लटकते. या व्हिडीओची सोशल मिडीयावर चर्चा होत आहे.

रशियातील जाबेकाल्स्की क्राय भागातील कश्तक गावातील ही घटना आहे. ही घटना गुरुवारी घडली आहे. पॅराशूट हेलिकॉप्टरच्या टेल रोटरमध्ये अडकते. त्यामुळे पॅराशूटमध्ये असलेली व्यक्ती हवेतच उलटी लटकते. पॅराशूटमधील व्यक्ती हवेत लटकत असल्याचे बघून हेलिकॉप्टर जमीनीवर उतरवण्याचा प्रयत्न करण्यात येतो. हेलिकॉप्टर जमिनीवर सुरक्षित उतरेपर्यंत ती व्यक्ती हवेतच उलटी लटकत होती.

या घटनेचा व्हिडीओ मॅक्सिम स्टेफनोविच नावाच्या स्थानिक नागरिकाने आपल्या कॅमेऱ्यात बनवला आहे. तसेच या घटनेची माहिती तातडीने पोलीस आणि लष्कराच्या जवानांना दिली. त्यानंतर मॅक्सिम यांनी हा व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर केला. तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्याची चर्चा होत आहे.

ही व्यक्ती लष्करी साहित्याचे परीक्षण करणारी असल्याची माहिती मिळाली आहे. आपण कॅमेरा झूम केला तेव्हा काहीतरी अघटित झाल्याचे आपल्याला वाटले. त्यामुळे या घटनेची आपण तातडीने पोलिसांना आणि लष्कारातील जवानांना महिती दिली. या भागात तापमान उणे 20 अंशाच्या खाली असते. त्यामुळे पॅराशूटला लटकलेल्या व्यक्तीला या वातावरणात अनेक समस्यांचा सामना करावा लागल्याचे मॅक्सिम यांनी सांगितले.

हेलिकॉप्टर सुरक्षित जमिनीवर उतरेपर्यंत ती व्यक्ती हवेतच उलटी लटकत होती. त्यामुळे आपल्याला त्या व्यक्तीची चिंता होती. एवढ्या उंचीवर आणि कमी तापमानात अशा अवस्थेत हवेतच लटकल्याने त्याच्या जीवाला धोका होता. मात्र, हेलिकॉप्टर सुरक्षित जमिनीवर उतरवून त्या व्यक्तीला सुरक्षित उतरवण्यात आले आहे. त्याला कोणतीही जखम झाली नसून ती व्यक्ती सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले.