प्रेयसीला मेसेज पाठवल्याच्या वादातून केला हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रेयसीला मेसेज का करतोय यावरून तरुणावर चाकूने हल्ला केल्याची घटना मानखुर्द परिसरात घडली. भारतकुमार नायडू असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी अक्रम नाईकला मानखुर्द पोलिसांनी अटक केली.

भारतकुमार हा मानखुर्दच्या साठेनगर येथे राहतो. तो डिलिव्हरी बॉयचे काम करतो. त्याच परिसरात अक्रमदेखील राहतो. शुक्रवारी भारतकुमार हा मित्रांसोबत सोरट नाका येथे उभा होता. काही वेळाने तेथे अक्रम आला. प्रेयसीला मेसेज का पाठवतोय या आरोपावरून त्यांच्यात वाद झाला. भारतकुमारने आपण मेसेज पाठवले नसल्याचे सांगितले. तेव्हा अक्रमने आपल्याला पुरावा असल्याचे त्याला सांगितले. यावरून त्यांच्यात वाद झाला.