उसाच्या शेतात गांजाची लागवड, फलटणमधील उपळवेत पाच लाखांची झाडे जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फलटण तालुक्यातील उपळवे गावच्या हद्दीमध्ये माळ नावाच्या शिवारात फलटण ग्रामीण पोलिसांनी उसाच्या शेतात छापा टाकून 5 लाख 25 हजार रुपये किमतीची सुमारे 13 किलो गांजाची झाडे जप्त केली. या प्रकरणी पिता-पुत्रावर गुन्हा दाखल केला आहे.

उपळवे गावातील माळ नावाच्या शिवारात हिंदुराव दादू लंबाते यांच्या मालकीच्या गट नंबर 846 मध्ये गांजाची झाडे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी बुधवारी छापा टाकला असता, तीन ते आठ फूट उंचीची 13 किलो वजनाची गांजाची झाडे आढळून आली. याप्रकरणी हिंदुराव दादू लंबाते (वय 60), सागर हिंदूराव लंबाते (वय 25) या पिता-पुत्रावर गुन्हा दाखल झाला आहे. गुह्याची फिर्याद पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे यांनी दिली.

फलटण ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे, काशीद, जगदाळे, कुंभार, जगदाळे, नायब तहसीलदार एस. एस. सावंत मॅडम, कृषी पर्यवेक्षक दत्तात्रय राऊत यांनी ही कारवाई केली.