अर्थवृत्त- शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स आणि निफ्टीत पडझड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ब्रिजस्टोन इंडिया
ब्रिजस्टोन इंडियाने भारतातील आपल्या कार्याचा ३० वर्षांचा टप्पा साजरा केला. या विशेष सोहळ्याला भारत आणि भूतान साम्राज्यामधील जपानचे असाधारण व पूर्णाधिकारी राजदूत ओनो केइची हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

टाटा मोटर्स
टाटा मोटर्सकडून अॅडवान्स्ड व्हेईकल स्क्रैपिंग फॅसिलिटी Re. Wi.Re चे उद्घाटन करण्यात आले. ५.५ एकर क्षेत्रातील पाटणा आरव्हीएसएफ कलाहानू बोथरा ग्रुपद्वारे चालवली जाते. प्रतिवर्ष १५,००० पर्यंत वाहने सुरक्षितपणे स्क्रैप करण्याची क्षमता आहे.

एस्प्रेसो कॉफी मेकर
टीटीके प्रेस्टिजने ऑल न्यू एस्प्रेसो कॉफी मेकर लाँच केला. हे घरांमध्ये खराखुरा कॅफेचा अनुभव आणण्यासाठी विचारपूर्वक डिझाइन करण्यात आले आहे. प्रेस्टिज एखेसो कॉफी मेकरची एमआरपी ७,१९५ रुपये आहे. बाजारात या कॉफी मेकरची विक्री सुरू करण्यात आली आहे.

‘नेक्सॉन कॅमों’ लाँच
टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्स टीएमपीव्हीने ९.९९ लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) या सुरुवातीच्या किमतीत नेक्सॉन कैमोच्या लाँचची घोषणा केली. यावेळी टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटीचे चीफ कमर्शियल ऑ फिसर विवेक श्रीवत्स उपस्थित होते.

हिंदुस्थानी शेअर बाजारात शुक्रवारी पडझड पाहायला मिळाली. दिवसअखेर बाजारातील सेन्सेक्स ४५५ अंकांनी घसरून ७८,४९९ अंकांवर बंद झाला, तर एनएसईचा निफ्टी ५० अंकांच्या किरकोळ घसरणीसह २४,५७० अंकांवर बंद झाला.

निफ्टी ५० इंडेक्समध्ये ग्रासीम इंडस्ट्रीज, टीसीएस, हिंडाल्को, एमअँडएम, एचसीएल टेक आणि एसबीआयच्या शेअर्समध्ये सर्वात जास्त वाढ पाहायला मिळाली. तर बजाज फायनान्स, बजाज रेंज रोव्हरतर्फे रोव्हर एसव्ही अल्ट्रा सादर रेंज रोव्हरने रेंज रोव्हर एसव्ही अल्ट्रा ही कार बाजारात सादर केली आहे.

उत्कृष्ट फिनिश ऑ डिओ तंत्रज्ञानासह सादर झालेली एसव्ही अल्ट्रा ही रेंज रोव्हरची आजवरची सर्वाधिक लक्झ्युरी आणि तांत्रिकदृष्ट्या आधुनिक अशी कार आहे. रेंज रोव्हर एसव्ही अल्ट्रा आता ३ कोटी ८० लाख (एक्स-शोरूम नवी दिल्ली) या किमतीला उपलब्ध आहे. रेंज रोव्हर एसव्ही अल्ट्रामधील अप्रतिम ऑडिओ तंत्रज्ञानात आता क्रांतीकारी एसव्ही इलेक्ट्रोस्टॅटिक साऊंड या नव्या तंत्रज्ञानाची भर पडली आहे. यामुळे गाडीची केबिन जणू एखाद्या कॉन्सर्ट हॉलसारखी भासते. शिवाय, यात बॉडी अॅण्ड सोल सीट्स आणि सेन्सरी हेप्टिक फ्लोअरही आहे.

स्वातंत्र्यदिनानिमित्त एसुसची लॅपटॉप ऑफर्स
एसुसने स्वातंत्र्यदिनानिमित्त विशेष लॅपटॉप ऑफर्स आणली आहे. ही ऑफर्स १६ ऑगस्टपर्यंत रिलायन्स डिजिटल, क्रोमा आणि विजय सेल्स येथे एसुसच्या गेमिंग आणि प्रीमियम लॅपटॉप्सवर आकर्षक ऑफर्स उपलब्ध आहे. ग्राहकांना लॅपटॉप्सवर तब्बल ५३ टक्क्यांपर्यंत सवलत मिळणार आहे. सणासुदीच्या विशेष सवलतींसोबतच ग्राहकांना निवडक बँक कार्डावर इन्स्टंट सवलती तसेच १२ महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट ईएमआयचा लाभही मिळणार आहे.

फिनसर्व, ट्रेंट, आयसीआयसीआय बँक, जिओ फायनान्शियल सर्विसेज आणि श्रीराम फायनान्सचे शेअर्समध्ये सर्वात जास्त घसरण झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्याचा फटका बाजाराला बसला. कच्चे तेल प्रति बॅरल ८३ डॉलरवर पोहोचले आहे.

निसान एसयूव्हीची ७५ वर्षे पूर्ण
निसान मोटर इंडिया प्रा. लि. ने (एनएमआयपीएल) निसान एसयूव्हीच्या उत्कृष्टतेची ७५ वर्षे साजरी करताना एका ऐतिहासिक वाहन क्षमतेचे प्रदर्शन करून ‘लेहला पोहोचणारा एकाच मॉडेलच्या चारचाकी वाहनांचा सर्वांत मोठा ताफा’ या अधिकृत विक्रमाद्वारे इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये स्थान मिळवले आहे. न्यू निसान टेक्टॉन प्रीमियम एसयूव्हीच्या ६० गाड्यांच्या ताफ्याने ५ दिवसांची हिमालयीन मोहीम पूर्ण केली.

ग्लोबल मार्केटमध्ये अस्थिर चित्र दिसत असल्याने गुंतवणूकदारांनी अनेक कंपन्यांचे शेअर्स विकले. तर काही शेअर्सची जोरदार खरेदी पाहायला मिळाली. एलआयसी, एसबीआय, टायटन यांसह काही निवडक कंपन्यांच्या शेअर्सला चांगली खरेदीदारी मिळाली. गुंतवणूकदारांनी ऑटो, मेटल आणि बँकिंग शेअर्समधून नफावसुली केली. स्ट्रेट ऑफ हॉर्मुजबद्दल नवीन अनिश्चितता पसरल्याने हिंदुस्थानी शेअर बाजारात घसरण झाली.

स्टैंडर्ड इंजिनीअरिंगचा नफा
स्टैंडर्ड इंजिनीअरिंग टेक्नॉलॉजी लिमिटेडने (एसईटीएल) आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या तिमाहीत पुन्हा एकदा विक्रमी कामगिरीची नोंद केली आहे. यासोबतच कंपनीच्या विकासाची दिशा बदलणाऱ्या दोन महत्त्वाच्या धोरणात्मक पावलांचीही घोषणा करण्यात आली आहे. एसईटीएलने २५२.२ रुपये कोटींचा एकूण महसूल नोंदवला आहे, जो मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत ४१.५ टक्के जास्त आहे. एबीटा २७.३ टक्क्यांनी वाढून ४४.१ कोटींवर पोहोचला आहे. नफ्याचे प्रमाण १७.५ टक्क्यांवर स्थिर आहे. करपूर्व नफा २६.५ टक्क्यांनी वाढून ३६ कोटी रुपये झाला आहे, तर करानंतरचा निव्वळ नफा २६.६ टक्क्यांनी वाढून २६.७कोटी झाला आहे.

ईमामीचे पॅकेज्ड स्नॅकिंग बाजारात
ईमामी अँग्रोटेक लिमिटेड (ईएएल) या संस्थेने आज वूईमी सादर करून देशात पॅकेज्ड स्टैंकिंग बाजारामध्ये पदार्पण केले. यावेळी ईमामी ग्रुपचे संचालक आदित्य वर्धन अग्रवाल, मनीष गोयेनका, विदुला अग्रवाल उपस्थित होते. चूईमीने यावेळी चॉको हेजलनट स्प्रेड, झुरी आलू भाजा, पोटेटो चिप्स हे तीन उत्पादने सादर केली. ईमामी अॅग्राटेकला अपेक्षा आहे पुढील ५ ते ७ वर्षांत जवळपास १ हजार कोटींचा नफा मिळवू शकेल.