
हिंदुस्थानातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकी आपली लोकप्रिय Alto नवीन अवतारात लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. नवीन अल्टोची टेस्टिंग देखील सुरू झाली आहे. चला तर या कारबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ.
नवीन अल्टो सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या मॉडेलपेक्षा अधिक उंच आणि रुंद असेल. हा नवीन मॉडेल Heartect प्लॅटफॉर्म तयार करण्यात येत आहे. Heartect प्लॅटफॉर्मवर तयार होणारी ही कार हलकी आणि आधी पेक्षा अधिक सुरक्षित असणार आहे. नवीन मॉडेलमध्ये नव्याने डिझाइन केलेले ग्रिल, स्वीप्टबॅक हेडलॅम्प आणि सी-आकाराचे फॉग लॅम्प दिले जाणार आहेत.
या कारचे इंटीरियरही बदलण्यात येणार आहे. नवीन 2022 मारुती अल्टोला स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, नवीन अपहोल्स्ट्री, ऑटोमॅटिक एसी युनिट आणि नवीन इंटीरियर थीमसह नवीन टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात येणार आहे. तसेच यात अल्टोमध्ये ड्युअल एअरबॅग्ज, EBD (इलेक्ट्रॉनिक ब्रेक-फोर्स डिस्ट्रिब्युशन) सह ABS (अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम), सीट बेल्ट रिमाइंडर, स्पीड अलर्ट आणि रिअर पार्किंग सेन्सर्स सारखे फीचर्स देण्यात येणार आहे.
नवीन अल्टोमध्ये 1.0-लिटर, 3-सिलेंडर K10 DualJet पेट्रोल इंजिन दिले जाऊ शकते. हेच इंजिन नवीन सेलेरियोमध्येही देण्यात आले आहे. या इंजिनसोबत मॅन्युअल आणि एएमटी गिअरबॉक्सचे पर्याय देखील दिले जाऊ शकते. तसेच कंपनी आपली नवीन अल्टो सीएनजी पर्यायसह देखील लॉन्च करू शकते.



























































