
माती म्हणजे अनेक मिनरल्स आणि पोषकघटकांचा खजिना आहे. आपल्याकडे पूर्वी मातीच्या मडक्यातून पाणी प्यायची सवय होती आणि कालांतराने तीच आपली परंपरा बनली.
लहान लहान छिद्र (सच्छिद्र) असलेल्या मातीच्या माठात पाणी नैसर्गिकरित्या थंड होण्यास मदत होते. उन्हाळ्यात आजही गावाकडे खूप वेळ लोड शेडींग असते किंवा अनेकदा वीजपुरवठा स्थगित होतो. अशावेळी तुमची तहान भागवण्यासाठी तुम्ही फ्रिजमधील थंड पाण्यावर अवलंबून राहू शकत नाही. त्यामुळे माठात पाणी भरून ठेवणे स्वस्त आणि पर्यावरण पूरक आहे.
शरीरातील ऍसिडिक वातावरणामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते. म्हणून शरीराच्या आतील वातावरण ऍसिडिक असण्यापेक्षा अल्कलाइन असेल तर आरोग्य उत्तम राहील. माती ही नैसर्गिकरीत्या अल्कालाइन असते. त्यामुळे मातीच्या माठात ठेवलेल्या पाण्यात मातीचे गुणधर्म मिसळून ते अल्कलाइन होते, असे डॉक्टर सांगतात.
बहुतांश प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये BPA नावाचे टॉक्सिक केमिकल असते. जे आरोग्याला धोकादायक असतात. म्हणून मातीच्या माठात पाणी ठेवणे अधिक आरोग्यदायी आहे. कारण त्यामुळे पाण्यात मातीचे गुणधर्म मिसळून ते अधिक आरोग्यदायी बनते. पाणी दूषित होत नाही.
माठ बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मातीत मुबलक मिनरल्स आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक ऊर्जा असते. त्यामुळे मातीच्या माठात पाणी ठेवल्याने मातीतील हे गुणधर्म पाण्यात मिसळतात. परिणामी त्या पाण्याने तुमच्या शरीराला फायदाच होतो.
कोरा (quora) या प्रश्न उत्तरांच्या एका संकेतस्थळावर विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देत असताना संकेत यांनी ही माहिती दिली.

































































