Video: तरुण दिसण्यासाठी मायावती रोज फेशियल करतात; भाजप आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । लखनौ

‘मायावती या 60 वर्षांच्या झाल्या आहेत पण दररोज फेशियल करून, केस काळे करून त्या तरुण राहायचा प्रयत्न करतात’, असे वादग्रस्त वक्तव्य भाजपचे आमदार सुरेंद्र नारायण सिंग यांनी केले आहे. मायावतींवर टीका करताना त्यांची जीभ घसरली.

मायावती यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राहणीमानावर टीका केली होती. ‘गेल्या लोकसभा निवडणूकीत ज्या व्यक्तीने स्वत:ला चहावाला घोषीत करत प्रचार केला आज ती व्यक्ती अगदी शाही अंदाजात राहत आहे. आता ते या निवडणूकीत मोठा गाजावाजा करत स्वत:ला चौकिदार घोषित करत आहेत. खरंच देश बदलतोय का?, अशी टीका मायावती यांनी केली होती.

या टीकेला उत्तर देताना सुरेंद्र नारायण यांनी मायावती यांच्यावर टीका केली. ‘मायावतीजी स्वत: रोज फेशियल करतात त्या आमच्या नेत्याला शौकीन कसं म्हणू शकतात. केस त्यांचे पांढरे झालेयत पण ते रंगवून आज पण मायावती स्वत:ला तरुण दाखवतात. 60 वर्षाच्या झाल्या आहेत पण त्यांचे सर्व केस काळे आहेत’, अशी टीका त्यांनी केली आहे.