अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने पळवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आई लग्नासाठीचे साहित्य खरेदी करण्यासाठी गेलेली असताना एका अज्ञात व्यक्तीने अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याची घटना चाकूर तालूक्यातील मौजे हटकरवाडी येथे घडली. या प्रकरणी चाकूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, त्यांची 17 वर्षाची मुलगी घरी होती. लग्नासाठीचे साहित्य खरेदी करण्यासाठी फिर्यादी आणि त्यांची पत्नी नळेगाव येथे गेले होते.

तेव्हा अज्ञात व्यक्तीने त्यांच्या मुलीला घरातून पळवून नेले. त्यानंतर गावात सर्वत्र शोधाशोध केली, नातेवाईकांकडेही चौकशी केली परंतू मुलीचा अजूनही शोध लागला नाही. त्यामुळे तिच्या कुटुंबियांनी अज्ञान व्यक्तिविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.