
बोगस डॉक्टर शोधून काढण्यासाठी येत्या काळात दरमहा तालुकानिहाय 5 डॉक्टरांच्या कागदपत्रांची तपासणी होणार आहे. याबाबत झालेल्या एका बैठकीत त्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांनी संबधित समितीला निर्देश दिले. या समितीची बैठक सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. आतापर्यंत जिल्हयात बोगस डॉक्टरची 13 प्रकरणे नोंदली आहेत. यात वेगाने कामकाज करुन ती अंतिम करावीत तसेच इतर बाबतीत आगामी काळात अधिक सतर्कता बाळगून कारवाईची कामगिरी करा असे ते म्हणाले.
गावागावात बोगस डॉक्टर आपले बस्थान बसवतात.गोरगरीब जनता बोगस डॉक्टरांना जाळ्यात फसतात. काही ठिकाणी आवश्यक पदवी नसताना डॉक्टर ती सेवा बजावताना दिसतात.अशा सर्व बोगस डॉक्टरांचा आता पर्दाफ़ाश होणार आहे.जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई होणार आहे.बोगस डॉक्टरांचा शोध घेताना आता तक्रारींची वाट न पहाता दर महिन्याला प्रत्येक तालुक्यातील पाच डॉक्टरांच्या कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे.त्यामुळे बोगस डॉक्टर लवकरच आरोग्य विभागाच्या जाळ्यात सापडणार आहेत.





























































